दायित्वशून्य प्रदूषण नियंत्रण मंडळ
सांगली – साखर कारखान्याच्या मळीच्या प्रदूषणामुळे कृष्णा नदीत लाखो माशांच्या मृत्यू झाला आहे. उदगाव-अंकलीजवळ या माशांचा खच पडला असून शेकडो लोकांनी हे मृत्यूमुखी पडलेले मासे नेण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. यापूर्वीही असा प्रकार झाला होता; मात्र या वेळी मृत्यू झालेल्या माशांची संख्या ही लाखांत आहे. उदगाव येथे गेल्या ८ दिवसांपासून पाण्याची पातळी अल्प झाली आहे, अशातच रसायनमिश्रीत मळीचे दूषित पाणी सोडल्याने नदीच्या पाण्याला दुर्गंधी येत आहे, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.
सौजन्य टीव्ही 9 मराठी