एम्.आय.एम्.चे खासदार इम्तियाज जलील यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद !

इम्तियाज जलील

संभाजीनगर – केंद्रशासन आणि राज्यशासन यांनी औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ असे नामांतर केले. त्याला विरोध म्हणून एम्.आय.एम्.चे खासदार इम्तियाज जलील यांनी त्यांच्या शेकडो समर्थकांसह ९ मार्चच्या रात्री शहरात ‘मेणबत्ती मोर्चा’ काढला. त्याला पोलिसांनी अनुमती नाकारली होती. तरीही मोर्चा काढल्यामुळे खासदार जलील आणि त्यांचे समर्थक यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.