बारामती (जिल्हा पुणे) – ‘अँग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट’ संचलित भारतातील पहिला देशी गोवंश सुधारणा प्रकल्प (सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर जेनेटिक इम्प्रूव्हमेंट – पशूधन अनुवंश सुधारणा केंद्र) आणि ‘एम्ब्रियो ट्रान्सफर लॅबोरेटरी’ यांचे उद्घाटन ११ मार्चला होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते, तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत हा समारंभ होणार आहे. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी दिली. सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर जेनेटिक इम्प्रूव्हमेंट किंवा पशूधन अनुवंश सुधारणा केंद्र हा देशी गोवंश आणि म्हैस यांमधील दूध उत्पादन वाढीचा उद्देश घेऊन राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि टाटा ट्रस्ट यांच्या वतीने उभारलेला हा प्रकल्प आहे.