सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज अँड नॉटिकल इंजिनीयरिंग ट्रेनिंग (सिफनेट)ची शाखा रत्नागिरीत चालू करा

पश्‍चिम किनारपट्टीवरील चार राज्यांत मोठी किनारपट्टी असूनही येथे सिफनेटची एकही शाखा नाही. सिफनेटद्वारे नॉटिकल इंजिनीयरींग मधील ४ वर्षांच्या पदवीपर्यंतचे अभ्यासक्रम शिकवले जातात. याचा लाभ येथील मासेमार, तसेच अनेक तरुणांना होऊ शकतो.

‘आष्टी’च्या साहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या चौकशीसाठी विशेष अधिकारी नेमण्यात येईल ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

तक्रार देण्यासाठी तक्रारदार पोलीस ठाण्यात गेले, पण त्यांच्यावर खोटे गुन्हे नोंद करून आष्टी पोलीस ठाण्याच्या साहाय्यक पोलीस निरीक्षकांनी त्यांना अमानुषपणे मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी

राज्यात ३७ कुटुंब न्यायालये कार्यरत ! – उपमुख्यमंत्री

राज्यात कौटुंबिक न्यायालयांची संख्या आवश्यकतेनुसार वाढवण्यात येत असून पायाभूत सोयी-सुविधांचे बळकटीकरण केले जाईल, तसेच एकाच विषयाचे खटले ३ ठिकाणी असून त्यांचे एकत्रीकरण केले जाईल.

गोव्यातील पाकधार्जिण्यांवर कारवाई करा !

गोव्यातील पाकिस्तानधार्जिण्या मुसलमानांवर कारवाई करण्याची मागणी म्हापसा येथील हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र जागृती आंदोलनाद्वारे करण्यात आली.

अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर जुन्या निवृत्ती वेतन योजनेसाठी बैठक घेणार ! – उपमुख्यमंत्री

वर्ष २०२८ नंतर २ लाख ५० सहस्र कर्मचारी निवृत्त होतील. हे सरकार पुढील सरकारवर व्यय टाकून जाणारे नसावे, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. 

गेल्या ११ मासांमध्ये पुणे रेल्वे विभागात विनातिकीट प्रवाशांकडून २२ कोटी रुपयांचा दंड वसूल !

नागरिकांवर नियम पालनाचा संस्कार नाही, हेच लक्षात येते. जे प्रवासी नियमांचे पालन करत नसतील त्यांना कठोर तुरुंगवासाची शिक्षाच द्यायला हवी !

छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याप्रमाणे हिंदु राष्ट्र असेल ! – सद्गुरु स्वाती खाडये

मदरशांना शासकीय अनुदान दिले जाते, कॉन्व्हेंट शाळांत बायबल शिकवले जाते आणि त्यांनाही अनुदान मिळते; मात्र वेदपाठशाळा किंवा गुरुकुल यांसाठी सरकारी अनुदान मिळू शकत नाही. राज्यघटनेद्वारेच होणारा हा अन्याय तुम्हाला मान्य आहे का ?

पंढरपूर येथील नामसंकीर्तन सभागृहास तात्काळ निधी उपलब्ध करून देणार ! – सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री

नामसंकीर्तन सभागृहाचे काम निधीअभावी अपूर्ण असून, यास आवश्यक निधीची तात्काळ उपलब्धता करण्यात येईल. येथे येणार्‍या भाविकांना उत्तम सोयी-सुविधा असलेले सभागृह उपलब्ध होईल- सुधीर मुनगंटीवार.

गुरूंवर अढळ श्रद्धा असली पाहिजे !

‘आपले डॉक्टर, अधिवक्ता, लेखा परीक्षक इत्यादींवर आपला विश्वास असतो. त्याहून कित्येक पटींनी अधिक केवळ विश्वासच नाही, तर श्रद्धा गुरूंवर असली पाहिजे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

अनुसूचित जमातीच्या जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीसाठी नवीन धोरण आणणार ! – उपमुख्यमंत्री

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांची संख्या वाढवणे, तसेच कामकाज अधिक गतीमान करण्यावर भर देण्यात येईल. वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी असणार्‍या अधिकार्‍यांना पालटण्याचाही निर्णय घेण्यात येईल.