थकबाकीदारांच्या नावांचे फलक चिपळूण शहरात झळकणार !
जे थकबाकीदार त्यांच्या कराची रक्कम नगरपालिकेकडे भरणार नाहीत, त्यांची नावे चिपळूण शहरात लावण्याचा निर्णय नगरपालिकेने घेतला आहे. ही कारवाई ७ मार्चपासून केली जाणार आहे.
जे थकबाकीदार त्यांच्या कराची रक्कम नगरपालिकेकडे भरणार नाहीत, त्यांची नावे चिपळूण शहरात लावण्याचा निर्णय नगरपालिकेने घेतला आहे. ही कारवाई ७ मार्चपासून केली जाणार आहे.
हिंदुत्वनिष्ठांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात धार्मिक श्रद्धांचा अवमान करण्याचा प्रयत्न केल्यास आंदोलकांवर गुन्हा नोंद करावा, अशी मागणी करण्यात आली होती.
प्रशांत यांच्या घरी ६ कोटी रुपये रोख मिळाले. प्रशांत हे बेंगळुरू पाणी पुरवठा आणि मलनिस्सारण मंडळाचे मुख्य लेखा अधिकारी आहेत.अशा लाचखोरांना कठोरातील कठोर शिक्षा झाली, तरच इतरांना त्याची वचक बसेल !
ब्रिटिशांची राणी तिच्या प्रजाननांच्या दृष्टीने चांगली असेलही , परंतु तिला भारतात वसाहतवाद असण्याविषयी कोणतीही खंत वाटली नाही , तसेच तिने हा हिरा तिच्या दागिन्यामध्ये बसवला. हे कितपत योग्य आहे ?
‘नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान’ यांच्या वतीने नवी मुंबईमध्ये महास्वच्छता अभियान राबवण्यात आले. ‘प्रतिष्ठानचे कार्य समाजहितकारक आहे’, अशी प्रतिक्रिया नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी व्यक्त केली.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात हक्कभंग आणण्याची सिद्धता केल्यानंतर विरोधकही मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत.
अंगणवाडी सेविकांच्या मानधनात २० टक्के वाढ करण्यात आली आहे, अशी घोषणा ३ मार्च या दिवशी महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ३ मार्च या दिवशी विधानसभेत तारांकित प्रश्नोत्तरात केली
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे पुणे जिल्ह्यातील बलीदानस्थळ, मौजे तुळापूर (तालुका हवेली) आणि समाधीस्थळ स्मारक, वढू (बु.) शिरूर येथील विकास आराखड्यास नियोजन विभागाने २८ जून २०२२ च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.
‘सत्य असते, तेच चिरंतन रहाते. धर्मशास्त्रातील सिद्धांत युगानुयुगे तसेच आहेत. त्यांत कोणी पालट करू शकलेला नाही. याउलट विज्ञानातील सिद्धांत काही वर्षांतच पालटतात; कारण विज्ञान अंतिम सत्य सांगू शकत नाही. तात्पर्य विज्ञानातील संशोधनाला अध्यात्मशास्त्राने मान्यता दिली, तरच ते सत्य समजले पाहिजे, हे लक्षात घ्या !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले