महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविकांच्या मानधनात २० टक्के वाढ ! – मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई, ३ मार्च (वार्ता.) – अंगणवाडी सेविकांच्या मानधनात २० टक्के वाढ करण्यात आली आहे, अशी घोषणा ३ मार्च या दिवशी महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ३ मार्च या दिवशी विधानसभेत तारांकित प्रश्‍नोत्तरात केली; मात्र ही मानधनवाढ अल्प आहे. ‘अंगणवाडी सेविकांचे प्रश्‍न सोडवण्यात सरकार अल्प पडत आहे’, असा आरोप करत विरोधकांनी सभात्याग केला. विशेष म्हणजे विधानसभेत सर्व पक्षांतील ८१ आमदारांनी हा तारांकित प्रश्‍न विचारला होता.