कर्नाटकातील भाजपच्या आमदाराच्या मुलाला ४० लाख रुपयांची लाच घेतांना अटक

बेंगळुरू (कर्नाटक) – भाजपचे आमदार माडाळु विरुपाक्षप्पा यांचा मुलगा प्रशांत कुमार यांना ४० लाख रुपयांची लाच घेतांना कर्नाटक लोकायुक्तांनी रंगेहात अटक केली. आमदार विरुपक्षप्पा यांच्या येथील कर्नाटक सोप अँड डिटर्जंट लिमिटेडच्या (के.एस्.डी.एल्.च्या) कार्यालयातून प्रशांत यांना अटक करण्यात आली. यानंतर लोकायुक्त अधिकारी प्रशांत यांच्या घरी पोचले. येथे त्यांना ६ कोटी रुपये रोख मिळाले. प्रशांत हे बेंगळुरू पाणी पुरवठा आणि मलनिस्सारण मंडळाचे मुख्य लेखा अधिकारी आहेत.

संपादकीय भूमिका

अशा लाचखोरांना कठोरातील कठोर शिक्षा झाली, तरच इतरांना त्याची वचक बसेल !