विधान परिषदेतून…
मुंबई, ३ मार्च (वार्ता.) – स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे पुणे जिल्ह्यातील बलीदानस्थळ, मौजे तुळापूर (तालुका हवेली) आणि समाधीस्थळ स्मारक, वढू (बु.) शिरूर येथील विकास आराखड्यास नियोजन विभागाने २८ जून २०२२ च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. या विकास आराखड्याच्या नावामध्ये अंशतः पालट करण्यात आला आहे, असे निवेदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २ मार्च या दिवशी विधान परिषदेत नियम ४६ अन्वये केले.
स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ व समाधी स्थळ विकास आराखड्याच्या नावात अंशत: बदल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसhttps://t.co/k2JrJZ3g5s pic.twitter.com/8Q5redRTxo
— News Today 24×7 (@NewsToday_24x7) March 3, 2023
ते म्हणाले की, या विकास आराखड्याच्या नावात अंशतः पालट करण्याचा निर्णय घेण्यात आला असून सुधारित नाव ‘स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलीदान स्थळ, मौजे तुळापूर, तालुका हवेली’ आणि ‘समाधीस्थळ स्मारक वढू (बु.), शिरूर, जिल्हा पुणे विकास आराखडा’ असे निश्चित करण्यात आले आहे.