बुलढाणा येथे इयत्ता १२ वीची गणिताची प्रश्‍नपत्रिका फुटली !

बुलढाणा – येथील सिंदखेडराजामध्ये इयत्ता १२ वीची गणिताची प्रश्‍नपत्रिका फुटली. परीक्षेच्या पूर्वीच अर्धा घंटा अगोदर सकाळी १०.३० वाजल्यापासून ही प्रश्‍नपत्रिका सामाजिक संकेतस्थळावरून प्रसारित झाली होती. ही प्रश्‍नपत्रिका कुणी फोडली ? यामागे कुणाचा हात आहे ? यात कोणती यंत्रणा कार्यरत आहे का ? याचे अन्वेषण चालू आहे. याविषयी प्रशासनाकडून पोलिसात गुन्हे नोंदवण्यात येत आहेत.

संपादकीय भूमिका 

शिक्षण क्षेत्रातील गलथान कारभार !