आग्वाद कारागृह संग्रहालयाची सुरक्षितता, हेलिकॉप्टर फेरी आणि कांदोळी येथील बांधाचे विस्तारीकरण यांविषयी ग्रामस्थांकडून प्रश्न उपस्थित

वारसास्थळ असलेल्या आग्वाद कारागृह संग्रहालयातील व्यवसाय, पर्यटकांसाठी चालू करण्यात आलेली हेलिकॉप्टर फेरी सेवा आणि कांदोळी येथील बांधाचे विस्तारीकरण याला विरोध करण्यात आला.

राजकारण होत असल्याने विकासाच्या प्रक्रियेला फटका ! – अजित पवार, विरोधी पक्षनेते

लाच दिल्याविना लोकांची कामे होत नाहीत. १ मास ३ दिवसांनी आर्थिक वर्ष संपणार आहे. तरीही जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीचे वितरण केलेले नाही. सरकार तिथे लक्ष देण्यास अल्प पडले आहे- अजित पवार

अमेरिकेसारखा एकाधिकार न ठेवता जगाला बहुकेंद्रीत करण्याचा रशियाचा प्रयत्न ! – पुतिन

अमेरिकी सरकारकडून युरोपीय व्यवसाय अमेरिकेच्या भूमीवर आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ऑस्ट्रेलियाने फ्रान्समधील एका उत्पादकाशी होत असलेला करार अचानक रहित करून तो एका अमेरिकी स्पर्धक आस्थापनाशी केला.

काँग्रेस पुन्हा ‘भारत जोडो’ यात्रा काढणार !

सोनिया गांधी यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत दिले. ‘राहुल यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेने माझा कार्यकाळ संपुष्टात येत आहे, याचा सर्वाधिक आनंद वाटत आहे’, असे विधान त्यांनी केले.

२ वर्षांनी देहलीत विश्व पुस्तक मेळ्याचे आयोजन !

हा पुस्तक मेळा जगातील सर्वांत मोठा पुस्तक मेळा आहे. यामध्ये देशातील कानाकोपर्‍यांतून लेखक, वाचक आणि विद्वान उपस्थित रहात असतात.

पर्रा येथे दंगल घडवल्याच्या प्रकरणी नायजेरियाच्या ४ नागरिकांची पुराव्याअभावी निर्दोष सुटका

विदेशातील नागरिक गोव्यात येऊन दंगल माजवू शकतात, हे पोलिसांना लज्जास्पद आहेच; पण त्याचसमवेत पुराव्याअभावी ते निर्दाेष सुटणे, हे पोलिसांच्या कार्यक्षमतेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे !

गोव्यात ‘पाकिस्तानी गल्ली’ उभी करणार्‍यांची नांगी ठेचा ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

हिंदु तरुणींना मुसलमान तरुण फसवून त्यांच्याशी निकाह करत आहेत. हिंदूंचा वंश संपवण्यासाठी हे कारस्थान रचले आहे. हिंदु तरुणींमध्ये धर्मप्रेम निर्माण करणे काळाची आवश्यकता आहे.

रत्नागिरी : मालगुंड येथे मराठी लोककलेवर आधारित कार्यक्रम

या कार्यक्रमामध्ये ‘मराठी भाषेतील लोककला’ यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धात्मक स्वरूपात आयोजित करण्यात येणार असून यामध्ये पोवाडे, भारुडे, गोंधळ, वासुदेव इत्यादी लोककलांचा समावेश करण्यात आला आहे.

रत्नागिरी : वाटद सरपंच अंजली विभुते यांच्या विरोधात अविश्‍वास ठराव संमत

सरपंचपदाच्या कालावधीत अंजली विभुते यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांचा फटका येथील स्थानिक व्यापार्‍यांना बसला होता. त्यामुळे ग्रामपंचायतीतील सर्वपक्षीय सदस्य विभुते यांच्या विरोधात एकवटले होते.

जिहादींवर आर्थिक बहिष्कार टाका ! – काजल हिंदुस्थानी

सकल हिंदु समाजच्या वतीने लव्ह जिहाद आणि लँड (भूमी) जिहाद यांच्या विरोधात वाशी येथे ‘विराट जनआक्रोश मोर्च्या’चे २६ फेब्रुवारी या दिवशी आयोजन करण्यात आले होते.