२ वर्षांनी देहलीत विश्व पुस्तक मेळ्याचे आयोजन !

विश्व पुस्तक मेळा

नवी देहली – येथे दोन वर्षांनी विश्व पुस्तक मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळ्याचे उद्घाटन परराष्ट्र आणि शिक्षण मंत्रालय यांचे राज्यमंत्री राजकुमार रंजन सिंह यांनी केले. या वेळी सिंह म्हणाले की, हा पुस्तक मेळा जगातील सर्वांत मोठा पुस्तक मेळा आहे. यामध्ये देशातील कानाकोपर्‍यांतून लेखक, वाचक आणि विद्वान उपस्थित रहात असतात.

सिंह पुढे म्हणाले की, या वेळी मेळ्याचा केंद्रीय विषय हा ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ हा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ष २०१८ मध्ये फ्रान्स सरकारसमवेत केलेल्या करारानुसार गेल्यावर्षी पॅरिस येथे आयोजित ‘पॅरिस पुस्तक मेळ्या’त भारत विशेष अतिथी देश होता. यंदा फ्रान्स नवी देहली पुस्तक मेळ्याचा अतिथी देश बनला आहे.