गोव्यात ‘पाकिस्तानी गल्ली’ उभी करणार्‍यांची नांगी ठेचा ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

  • म्हापसा येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा !

  • ५०० हून अधिक धर्माभिमानी हिंदूंची उपस्थिती

श्री. मनोज खाडये

म्हापसा, २६ फेब्रुवारी (वार्ता.) – धार्मिक सलोखा जपणार्‍या गोव्यात ‘पाकिस्तानी गल्ली’ उभी करणार्‍या धर्मांध मुसलमानाला स्थानिकांनी क्षमा मागण्यास भाग पाडले; पण ही क्षमा पश्चात्तापातून त्याने मागितलेली नाही. स्थानिकांना शांत करण्यासाठी वरवर मागितलेली ही क्षमा आहे. या मानसिकतेच्या मागचे सूत्रधार शोधून त्यांची नांगी ठेचून काढली पाहिजे. यासाठी हिंदूंनी कृतीशील व्हावे’, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी केले.

हिंदु जनजागृती समितीने श्री सिद्धपुरुष नारायणदेव देवस्थान सभागृह, काणका बांध, म्हापसा येथे आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत ते बोलत होते. या वेळी ‘रणरागिणी’च्या गोवा शाखेच्या सौ. राजश्री गडेकर यांची उपस्थिती होती.

धर्माभिमानी हिंदूंची उपस्थिती

सभेला शंखनादाने प्रारंभ झाला. यानंतर सौ. राजश्री गडेकर आणि श्री. मनोज खाडये यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. पुरोहित श्री. श्रेयस पिसोळकर आणि श्री. पवन बर्वे यांनी वेदमंत्रपठण केले. श्री. मनोज खाडये यांनी नंतर त्यांच्या मार्गदर्शनात हलाल जिहाद, भूमी जिहाद, वक्फ बोर्डचा कायदा आणि त्याद्वारे मुसलमान हडप करत असलेल्या भूमी आदी विषयांवर सविस्तर माहिती देऊन हिंदूंना या आघातांच्या विरोधात आवाज उठवण्याचे आवाहन केले.

प्रारंभी हिंदु जनजागृती समितीचे उत्तर गोवा समन्वयक श्री. गोविंद चोडणकर यांनी समितीच्या कार्याची ओळख करून दिली. सभेत सूत्रसंचालन श्री. राहुल वझे यांनी केले, तर आभारप्रदर्शन श्री. शेखर आगरवाडेकर यांनी केले.

४ मार्चला ‘राष्ट्रीय महाआंदोलन’ !

पाकधार्जिण्यांना आळा घालण्यासाठी शनिवार, ४ मार्च या दिवशी सायंकाळी ५ वाजता म्हापसा नगरपालिका प्रवेशद्वारासमोर ‘राष्ट्रीय महाआंदोलन’ केले जाणार आहे. या आंदोलनात सहभागी होण्याची शपथ घेऊया, असे आवाहन श्री. मनोज खाड्ये यांनी केले असता उपस्थितांनी भ्रमणभाषचा ‘टॉर्च’ चालू करून अनुमोदन दिले.

आपल्या भागातील एकही हिंदु तरुणी लव्ह जिहादला बळी पडणार नाही, यासाठी प्रयत्न करूया ! – सौ. राजश्री गडेकर

सौ. राजश्री गडेकर

सौ. राजश्री गडेकर ‘लव्ह जिहाद’ या विषयावर मार्गदर्शन करतांना म्हणाल्या, ‘‘ हिंदु तरुणींना मुसलमान तरुण फसवून त्यांच्याशी निकाह करत आहेत. हिंदूंचा वंश संपवण्यासाठी हे कारस्थान रचले आहे. यावर हिंदु तरुणींमध्ये धर्मप्रेम निर्माण करणे काळाची आवश्यकता आहे. असे झाले, तरच आपल्या तरुणी अशा धर्मांधांच्या वासनेच्या बळी ठरणार नाहीत. यासाठी हिंदूंनी संघटित होऊन धर्मतेज जागृत करूया. आपल्या भागातील एकही हिंदु तरुणी लव्ह जिहादला बळी पडणार नाही, यासाठी आपण प्रयत्न करूया. यासाठी आपल्या भागात धर्मशिक्षणवर्ग चालू करण्यासाठी पुढाकार घ्या.’’