यादगिरी (कर्नाटक) येथील चौकाला टिपू सुलतानऐवजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्यावरून तणाव

कर्नाटकात भाजपचे सरकार असतांना टिपू सुलतनाचे नाव कसे काय दिले जात आहे ?, असा प्रश्न हिंदूंच्या मनात उपस्थित होणारच !

सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांत विविध ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने सांगली, कोल्हापूर  आणि सातारा जिल्ह्यांत विविध संघटनांच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले.

(म्हणे) ‘एक दिवस सर्व शिखांना मुसलमान बनवणार !’ – मौलाना महंमद सुलेमान

याविषयी खलिस्तानवादी गप्प का ? पाकच्या साहाय्याने भारतात खलिस्तानी कारवाया करणार्‍या खलिस्तानवाद्यांना धर्मांध मुसलमान अधिक जवळचे वाटतात का ?

देहली उच्च न्यायालयाने ‘अग्नीपथ’ योजनेच्या संदर्भातील सर्व याचिका फेटाळल्या !

देहली उच्च न्यायालयाने केंद्रशासनाच्या ‘अग्नीपथ’ या सैन्यातील भरती संदर्भातील योजनेला आव्हान देणार्‍या सर्व याचिका फेटाळल्या आहेत. ‘ही योजना आणण्याचा उद्देश देशाच्या सैन्याला अधिकाधिक सक्षम करणे हा आहे आणि ते देशाच्या हिताचे आहे’, असे मत न्यायालायने याचिका फेटाळतांना म्हटले आहे.

त्रिशूर (केरळ) येथील श्रीकृष्ण मंदिरात धार्मिक विधींसाठी यांत्रिक हत्तींचा वापर करण्यात येणार !

त्रिशूर येथील इरिंजादापल्ली श्रीकृष्ण मंदिरात आता धार्मिक विधी करण्यासाठी हत्तींऐवजी यांत्रिक हत्ती वापरण्यात येणार आहे. या हत्तीची उंची साडे दहा फूट असून त्याचे एकूण वजन ८०० किलो आहे. या हत्तीवर ४ जण स्वार होऊ शकतात. या हत्तीची सोंड, डोके, डोळे आणि कान सर्व विजेवर चालतात.  

पॅलेस्टाईन नागरिकांनी इस्रायलच्या २ नागरिकांची हत्या केल्यानंतर वेस्ट बँकमध्ये हिंसाचार !

पॅलेस्टाईनकडून इस्रालयच्या २ नागरिकांची हत्या करण्यात आल्यानंतर वेस्ट बँकमध्ये हिंसाचार होत आहे. शेकडो इस्रायली नागरिकांनी रस्त्यावर उतरून चारचाकी वाहने आणि घरे यांना आग लावली आहे. यात एका नागरिकाचा मृत्यू झाला, तर ४ जण घायाळ झाले आहेत.

युक्रेनच्या प्रमुख कमांडरला पदावरून हटवले !

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदोमिर झेलेंस्की यांनी त्यांच्या सैन्याच्या जॉइंट फोर्सचे कमांडर मेजर जनरल एडवर्ड मिखाइलोविच मोसकालोव यांना पदावरून हटवले आहे. त्यांची गेल्या वर्षी मार्चमध्ये या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. त्यांना पदावरून का हटवण्यात आले, याचे कारण सरकारकडून देण्यात आलेले नाही.

भारत-बांगलादेश सीमेवर १०० हून अधिक जणांचे सैनिकांवर सशस्त्र आक्रमण  

सैनिकांवर शस्त्रांद्वारे आक्रमण होत असतांना त्यांना गोळीबार करण्याचा आदेश नाही का ? सैनिकांना मारहाण करून त्यांच्याकडील बंदुका हिसकावून नेण्यात येत असतील, तर सीमेवर सैनिकांना तैनात तरी कशाला करण्यात आले आहे ?

ऊर्जा संकटाला तोंड देण्यासाठी जर्मनीला करावे लागणार ८३ लाख कोटी रुपयांचे प्रावधान !

ऊर्जा संकटामुळे निर्माण झालेले धोके आणि आव्हाने यांना तोंड देण्यासाठी वर्ष २०३० पर्यंत जर्मनी सरकारला १ सहस्र अब्ज डॉलर्सची म्हणजेच जवळपास ८३ लाख कोटी रुपयांची तरतूद करावी लागेल, असा अंदाज आर्थिक क्षेत्रातील जागतिक आस्थापन ‘ब्लूमबर्ग’ने वर्तवला आहे.

सरकारने हिंदूंच्या संयमाचा अंत न पहाता ‘लव्ह जिहाद’ आणि ‘लँड जिहाद’ विरोधात कायदा करावा ! – माजी आमदार संदीप नाईक

लव्ह जिहाद विरोधात आजचा हा जनजागरण मोर्चा आहे. लव्ह जिहादच्या माध्यमातून मुलींवर धर्मांतरासाठी अत्याचार केले जातात. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने धर्मांतर बंदी कायदा लवकर करावा.