बलुचिस्तानमधील बाँबस्फोटात ४ जण ठार

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानाने बळकावलेल्या बलुचिस्तानमध्ये झालेल्या बाँबस्फोटात ४ जण ठार, तर १० जण घायाळ झाले. हा बाँबस्फोट बरखान शहरातील रखनी मंडईमध्ये झाला. बरखानचे उपायुक्त अब्दुल्ला खोसो यांनी सांगितले की, बाँब दुचाकीमध्ये लावण्यात आला होता.