हिंदु राष्ट्र-जागृती सभेनिमित्त अंबड (जिल्हा जालना) येथे वाहन फेरी !

धर्मध्वजाचे पूजन आणि पुष्पवृष्टी !

वाहन फेरीत सहभागी धर्मप्रेमी

अंबड, २५ फेब्रुवारी (वार्ता.) – अंबड येथे २६ फेब्रुवारी या दिवशी होणार्‍या हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या निमित्ताने सायंकाळी ५ वाजता वाहन फेरी काढण्यात आली. सनातनचे संत सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्या हस्ते ध्वजाचे पूजन करून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून फेरीला प्रारंभ झाला. पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौकात फेरीची सांगता करण्यात आली. फेरीत पुष्कळ दुचाकी वाहनांसह अनेक धर्मप्रेमी बंधू भगिनी उपस्थित होते.

‘कौन चले रे कौन चले’, ‘हिंदु राष्ट्र के वीर चले’, ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘हर हर महादेव’ अशा घोषणांनी शहर दणाणून गेले. फेरीच्या मार्गाने अनेक चौकांत धर्मध्वजाचे पूजन आणि पुष्पवृष्टी करण्यात आली.


अंबड (जिल्हा जालना) येथे ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अंबड (जिल्हा जालना) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

दिनांक : रविवार, २६ फेब्रुवारी २०२३

स्थळ : दत्ताजी भाले शाळेचे मैदान, जिल्हा जालना, अंबड.

वेळ : सायंकाळी ५

या सभेला हिंदु धर्माभिमान्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.