नेपाळमध्ये उपपंतप्रधानांसह ४ मंत्र्यांचे त्यागपत्र

प्रचंड सरकारने विरोधी पक्षातील राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याचा परिणाम !

काठमांडू (नेपाळ) – नेपाळच्या पुष्प कमल दहल प्रचंड यांच्या सरकारमधील उपपंतप्रधान राजेंद्र सिंह लिंगडेन यांच्यासह राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाच्या (आर्.पी.पी.) ४ मंत्र्यांनी त्यागपत्र दिले आहे. प्रचंड सरकारने आघाडीतून बाहेर पडून विरोधी पक्ष नेपाळी काँग्रेसचे रामचंद्र पौडेल यांना राष्ट्रपतीपदासाठी पाठिंबा देण्याची घोषणा केल्यामुळे संतप्त झालेल्या आर्.पी.पी.च्या मंत्र्यांनी सरकारमधून बाहेर पडण्याचा निणय घेतला. या मंत्र्यांच्या पक्षाने अद्याप अधिकृतपणे सरकारचा पाठिंबा काढलेला नाही.