छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचे बोट धरूनच मी पुढे जात आहे ! – खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले

छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व युगांमध्ये आदरणीय आहेत. त्यांनी सार्वभौमत्व आणि समता यांचे दिलेले विचार आजही मार्गदर्शक आहेत. छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय लवकरच खुले होईल.

अतीवृष्टी अनुदान घोटाळ्यांकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी वैजापूर तहसीलदारांना जिल्हाधिकार्‍यांची कारणे दाखवा नोटीस !

शेतकर्‍यांना दोनदा अनुदान वाटपप्रकरणी तहसीलदार गायकवाड हे दोषी असल्याचे स्पष्ट दिसून येते. त्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची वरवरची कारवाई करण्यापेक्षा कठोर कारवाई करणे आवश्यक !

विद्यापीठ आणि महाविद्यालयीन कर्मचार्‍यांचा आजपासून अनिश्चित काळासाठी संप !

‘महाराष्ट्र राज्य विद्यापीठ आणि महाविद्यालयीन सेवक कृती समिती’ने चालू केलेल्या संपामुळे विद्यापीठ स्तरावर होणार्‍या सर्वच परीक्षांवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

संभाजीनगर येथे भरधाव कार थेट दुकानात घुसल्याने दुकानदाराचा मृत्यू !

नागपूर-मुंबई महामार्गावर असलेल्या एका दुकानात भरधाव चारचाकी घुसल्याने दुकानदार रोहित पवार यांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाला सर्वोच्च न्यायालयच विराम देऊ शकते ! – उज्ज्वल निकम, ज्येष्ठ विधीज्ञ 

केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय विचारांती घेतलेला नाही. सकृतदर्शनी काही मूलभूत चुका झालेल्या आहेत’, हे ठाकरे गटाला सिद्ध करावे लागेल.

समस्त हिंदूंनी जातपात विसरून राष्ट्रनिर्मितीसाठी योगदान द्यावे ! – योगऋषी रामदेवबाबा

पतंजलि योगपीठ आणि श्रीदत्त पद्मनाभ पीठ यांच्यामध्ये अतूट असे नाते निर्माण झाले आहे. हिंदु धर्म, संस्कृती आणि सनातन धर्मातील विविध घटक यांना संघटित करण्याचे महान कार्य पद्मश्री प.पू. ब्रह्मेशानंद स्वामी महाराज करत आहेत.

हल्लीच्या महिलांनी अंतर्मुख होणे आवश्यक !

‘कुठे पतीबरोबर थोडा वाद झाला की, घटस्फोट घेणार्‍या हल्लीच्या पत्नी, तर कुठे पतीच्या निधनानंतर त्याच्याशी एकरूप झाल्याने जोहार करणार्‍या, म्हणजे देह अग्निसमर्पण करणार्‍या पद्मावती राणी आणि तिच्या सोबतच्या १६ सहस्र राजपूत स्त्रिया !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

जात्‍यंधांवर कारवाई हवीच !

श्रीसमर्थ संप्रदाया’चे सर्वेसर्वा आणि ज्‍येष्‍ठ निरुपणकार पू. अप्‍पासाहेब धर्माधिकारी यांना राज्‍यशासनाचा यंदाचा ‘महाराष्‍ट्र भूषण’ पुरस्‍कार घोषित झाला आहे. या पुरस्‍काराला जात्‍यंध संघटना संभाजी ब्रिगेडने विरोध केला आहे. पू. अप्‍पासाहेब यांनी व्‍यसनमुक्‍तीसाठी आदिवासी भागांतही जाऊन मोठे कार्य केले आहे.

अकार्यक्षम अग्‍नीशमन यंत्रणा !

जळगाव जिल्‍ह्यातील चोपडा येथे एका घराच्‍या दुसर्‍या माळ्‍याला शॉर्ट सर्किटमुळे मध्‍यरात्री १.३० वाजता आग लागली होती. चोपडा पालिकेचे दोन अग्‍नीशमन दलाचे बंब घटनास्‍थळी पोचले; मात्र दोन्‍ही बंबांचे पाईप फाटलेले होते, व्‍हॉल्‍व्‍ह नादुरुस्‍त, कर्मचारी अप्रशिक्षित, कर्मचार्‍यांकडे संरक्षित उपकरणे नव्‍हती.

खलिस्तानवाद्यांवर कारवाई करा !

ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध गायत्री मंदिराचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना एका खलिस्तानवाद्याने दूरभाष करून ‘मंदिरात महाशिवरात्र साजरी करायची असेल, तर  पुजार्‍याला ५ वेळा ‘खलिस्तान झिंदाबाद’ म्हणण्यास सांगा’, अशी धमकी दिली.