श्रीरामचरितमानसवर बंदी घालण्याची मागणी करणारे स्वामी प्रसाद मौर्य यांची जीभ कापणार्‍याला ५१ सहस्र रुपयांचे बक्षीस देणार !

हिंदु महासभेची घोषणा !

दिग्विजय सिंह यांच्या सर्जिकल स्टॉईकविरोधी विधानापासून काँग्रेसची फारकत !

‘भारतीय सैन्याने केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’वर प्रश्‍न उपस्थित करणार्‍या दिग्विजय सिंह यांच्यावर पक्ष काय कारवाई करणार ?’, हेही काँग्रेसने जनतेला सांगावे !

‘स्पाइसजेट’च्या विमानात हवाई सुंदरीसमवेत गैरवर्तन

गैरवर्तन करणार्‍या व्यक्तीला आणि त्याच्यासमवेत असलेल्या अन्य एका प्रवाशाला विमानातून उतरवण्यात आले. त्यांना विमातळाच्या सुरक्षा विभागाकडे सुपूर्द करण्यात आले.

जिवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर अंनिसचे शाम मानव यांच्या सुरक्षेत वाढ !

‘बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री महाराज यांच्याविरुद्ध बोलणे थांबवले नाही, तर तुमचा नरेंद्र दाभोलकर करू’, अशी धमकी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक शाम मानव यांना २३ जानेवारी या दिवशी दूरभाषद्वारे देण्यात आली आहे.

कौशांबी (उत्तरप्रदेश) येथे येशू दरबारच्या नावाखाली हिंदूंचे धर्मांतर

हिंदु संघटनांच्या विरोधानंतर प्रशासनाने केला बंद – जे हिंदुत्वनिष्ठ संघटनांना कळते, ते पोलीस आणि प्रशासन यांना का कळत नाही ?

श्रीराममंदिरातील श्रीरामाच्या मूर्तीसाठी नेपाळच्या गंडकी नदीतून शोधण्यात आली शाळिग्राम शिळा !

या शाळिग्राम शिळेवरच भगवान विष्णूंचे निवासस्थान असल्याचे मानले जाते. शाळिग्राम शिळेद्वारे घडवलेल्या मूर्तीद्वारे सुखी जीवन, समृद्धी, वाईट शक्तींपासून संरक्षण, उत्तम आरोग्य, वैश्‍विक आनंद आणि देवाची कृपा हे ६ लाभ होतात, अशी मान्यता आहे.

जेव्हा लोक व्यवस्था किंवा त्याचे ठेकेदार यांना घाबरतात, तेव्हा तेथे दडपशाही चालू असते ! – कर्नाटक उच्च न्यायालय

जेव्हा व्यवस्था किंवा त्याचे ठेकेदार हे लोकांना घाबरतात, याचा अर्थ तेथे स्वातंत्र्य असते; मात्र जेव्हा लोक व्यवस्था आणि त्याचे ठेकेदार यांना घाबरतात, तेव्हा मात्र तेथे दडपशाही चालू असते, असे विधान कर्नाटक उच्च न्यायालयाने केले.

तुम्ही मला साथ द्या, मी हिंदु राष्ट्र बनवेन !

पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांचे हिंदूंना आवाहन ! ‘तुम्ही मला साथ द्या, मी हिंदु राष्ट्र बनवेन’, अशी घोषणा येथील बागेश्‍वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी २३ जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या दिवशी त्यांच्या रायपूर येथील दरबारमध्ये केली.

भारतीय बनावटीची मोबाईल ऑपरेटिंग सिस्टिम ‘भरोस’चे परीक्षण

केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्वदेशी बनावटीची मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम (ओ.एस्., भ्रमणभाष प्रणाली) ‘भरोस’चे परीक्षण केले. ही प्रणाली आयआयटी मद्रासने विकसित केली आहे.

पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्यावर प्रश्‍न उपस्थित करणारे हिंदू सनातन धर्माच्या विरोधात !

द्वारका पीठाचे शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती यांचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांना समर्थन !