श्रीरामचरितमानसवर बंदी घालण्याची मागणी करणारे स्वामी प्रसाद मौर्य यांची जीभ कापणार्‍याला ५१ सहस्र रुपयांचे बक्षीस देणार !

हिंदु महासभेची घोषणा !

हिंदु महासभेच्या कार्यकर्त्यांनी काढली स्वामी प्रसाद मौर्य यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा

आगरा (उत्तरप्रदेश) – समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी श्रीरामचरितमानसवर बंदी घालण्याची मागणी केल्यावर हिंदु संघटनांकडून त्यांचा विरोध केला जात आहे. आगरा येथे हिंदु महासभेच्या कार्यकर्त्यांनी स्वामी प्रसाद मौर्य यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली.

यानंतर हिंदु महासभेचे आगरा जिल्हा प्रभारी सौरभ शर्मा यांनी स्वामी प्रसाद मौर्य यांची जीभ कापणार्‍याला ५१ सहस्र रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. शर्मा म्हणाले की, मौर्य यांनी आमच्या धार्मिक ग्रंथाचा अपमान केला आहे. त्यांनी हिंदूंच्या भावनाही दुखावल्या आहेत.