‘स्पाइसजेट’च्या विमानात हवाई सुंदरीसमवेत गैरवर्तन

प्रवाशाला विमानातून उतरवून सुरक्षारक्षकाकडे सोपवले !

हवाई सुंदरीसमवेत गैरवर्तन करणारा प्रवासी (डावीकडे)

नवी देहली – देहली येथून भाग्यनगर येथे जाणार्‍या ‘स्पाईसजेट’ या विमान वाहतूक करणार्‍या आस्थापनाच्या विमानात चढतांना एका प्रवाशाने हवाई सुंदरीशी (एअर होस्टेसशी) गैरवर्तन केले. या प्रवाशाला थांबवण्यात आल्यावर त्याने सगळ्या कर्मचार्‍यांसमवेत गैरवर्तन केले. त्यामुळे विमानात बसण्यासाठी प्रवाशांना थांबवण्यात आले.

पुढे हे प्रकरण वाढतच गेल्याने कर्मचार्‍यांनी वैमानिक आणि सुरक्षारक्षक यांना याची माहिती दिली. यानंतर गैरवर्तन करणार्‍या व्यक्तीला आणि त्याच्यासमवेत असलेल्या अन्य एका प्रवाशाला विमानातून उतरवण्यात आले. त्यांना विमातळाच्या सुरक्षा विभागाकडे सुपूर्द करण्यात आले.