कौशांबी (उत्तरप्रदेश) येथे येशू दरबारच्या नावाखाली हिंदूंचे धर्मांतर

  • हिंदु संघटनांच्या विरोधानंतर प्रशासनाने केला बंद

  • पोलिसांकडून गुन्हा नोंद

येशू दरबारच्या नावाखाली हिंदूंचे धर्मांतर

कौशांबी (उत्तरप्रदेश) – येथे येशू दरबारच्या नावाखाली हिंदूंचे धर्मांतर करण्यात येत असल्याने हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी त्याला विरोध केल्याने प्रशासनाने दरबार बंद केला. तसेच भविष्यात दरबार लावण्यापूर्वी प्रशासनाची अनुमती घेण्याचा आदेश दिला. या प्रकरणी पोलिसांनी आयोजकांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. येथील धर्मांतराचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे.

१. महंमदपूर पुरैनी गावात ही घटना घडली. दरबाराचे आयोजन मसीही समाजाच्या लोकांकडून करण्यात आले होते. त्या वेळी हिंदु महासभेचे कार्यकर्ते तेथे पोचले आणि त्याला विरोध केला. कार्यकर्त्यांनी आयोजकांवर अंधश्रद्धा आणि धर्मांतर यांना प्रोत्साहन देण्यात येत असल्याचा आरोप केला. स्थानिक हिंदूंनीही या प्रकरणी आयोजकांना कार्यक्रम बंद करण्यास आणि पुन्हा आयोजन करतांना प्रशासनाची अनुमती घेण्याविषयी खडसावले.

२. या प्रकरणी हिंदु जागरण मंचचे पदाधिकारी वेद प्रकाश पांडेय यांनी सांगितले की, बर्‍याच काळापासून येथे हिंदूंना भूत-प्रेत यांचे भय दाखवून, तसेच आमीष दाखवून ख्रिस्ती बनवले जात होते.

संपादकीय भूमिका

जे हिंदुत्वनिष्ठ संघटनांना कळते, ते पोलीस आणि प्रशासन यांना का कळत नाही ?