भारतीय बनावटीची मोबाईल ऑपरेटिंग सिस्टिम ‘भरोस’चे परीक्षण

डावीकडूनकेंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव

नवी देहली – केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्वदेशी बनावटीची मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम (ओ.एस्., भ्रमणभाष प्रणाली) ‘भरोस’चे परीक्षण केले. ही प्रणाली आयआयटी मद्रासने विकसित केली आहे.

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, ही प्रणाली वापरण्याच्या प्रक्रियेमध्ये अनेक अडचणी येतील. जगभरातील काही लोक यात अडचणी निर्माण करतील आणि ही प्रणाली यशस्वी होऊ नये; म्हणून अडथळे निर्माण करतील. आपल्याला अत्यंत सावधपणे आणि सातत्याने प्रयत्न करून ती यशस्वी करण्यासाठी काम करावे लागेल.