दिग्विजय सिंह यांच्या सर्जिकल स्टॉईकविरोधी विधानापासून काँग्रेसची फारकत !

(म्हणे) सैन्यावर आमचा पूर्ण विश्‍वास ! – राहुल गांधी

जम्मू – काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी वर्ष २०१६ मध्ये भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’वर प्रश्‍न उपस्थित करणार्‍या विधानापासून काँग्रेसने फारकत घेतली आहे. याविषयी काँग्रेसचे नेते राहुल गांधी म्हणाले की, दिग्विजय सिंह यांनी ‘सर्जिकल स्ट्राईक’वर जे विधान केले आहे त्याच्याशी मी पूर्णपणे असहमत आहे. आमचा आमच्या सैन्यावर पूर्ण विश्‍वास आहे. सैन्याने काही केले, तर पुरावे देण्याची आवश्यकता नाही.

दिग्विजय सिंह यांनी ‘भारत जोडो’ यात्रेमध्ये म्हटले होते, ‘सरकारने सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे कधीच दिले नाहीत’, असे विधान केले होते. जेव्हा त्यांच्या विधानावरून वाद निर्माण झाला, तेव्हा सिंह यांनी ‘आम्ही भारतीय सैन्याचा आदर करतो आणि ते आमच्यासाठी सर्वस्व आहेत’, अशी कोलांटउडी मारली.

संपादकीय भूमिका

‘भारतीय सैन्याने केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’वर प्रश्‍न उपस्थित करणार्‍या दिग्विजय सिंह यांच्यावर पक्ष काय कारवाई करणार ?’, हेही काँग्रेसने जनतेला सांगावे !