नंदुरबार येथे लव्ह जिहाद आणि महिला सुरक्षा जनजागृतीपर व्याख्यान पार पडले !

प्रथम हिंदु राष्ट्र संस्थापक वीर शिरोमणी महाराजा खेतसिंहजी यांच्या ८८२ व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

शासकीय कामकाजात देवनागरी लिपीतील सुधारणांचा अवलंब करण्यास ६ मासांची मुदतवाढ !

शासकीय कामकाजात वापरण्यात येणार्‍या देवनागरी लिपीमध्ये करण्यात आलेल्या सुधारणा लागू करण्यासाठी शासनाकडून ६ मासांची मुदतवाढ देण्यात आली आहे. या सुधारणांमध्ये वर्णमालेतील १२ स्वरांमध्ये ‘ॲ’ आणि ‘ऑ’ या २ अधिक स्वरांचा समावेश करण्यात आला आहे.

‘धर्मांतर आणि लव्ह जिहाद’ यांविषयी प्रबोधन होणार असल्याने मेळाव्याला उपस्थित रहा ! – महंत जितेंद्र महाराज

गोद्री (जिल्हा जळगाव) येथे २५ जानेवारीपासून ‘अखिल भारतीय बंजारा महाकुंभ मेळाव्या’चे आयोजन !

सध्याच्या युवकांसाठी ढाब्यावर टेबल न्यून पडत आहेत, हे खेदजनक ! – ह.भ.प. शिवाजीराव मोरे महाराज देहूकर

या वेळी ह.भ.प. मोरे महाराज म्हणाले की, देशात अन्य प्रांतांमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक संत जन्माला आले आहेत. समाज ज्ञानेश्वरी आणि गाथा यांचे वाचन करत राहील, तोपर्यंत समाजातील नैतिकता आणि अस्मिता जिवंत राहील.

मृत तरुणाच्या कुटुंबास पुणे महापालिकेने १६ लाख रुपयांची हानीभरपाई देण्याचा दिवाणी न्यायालयाचा आदेश !

रस्त्यातील खड्ड्यांत दुचाकी घसरून यश सोनी या तरुणाचा २६ जून २०१६ या दिवशी मृत्यू झाला होता. मुलाच्या मृत्यूच्या प्रकरणी दिनेश सोनी यांनी महापालिकेच्या विरोधात १ कोटी रुपयांचा दिवाणी दावा प्रविष्ट केला होता.

सातारा येथे अजित पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचा कडेलोट !

भाजप युवा मोर्चाच्या वतीने हा कडेलोट करण्यात आला, तसेच अजित पवार यांनी समस्त हिंदूंच्या भावना दुखावल्या असून क्षमा मागावी, अन्यथा सातारा शहरामध्ये त्यांना फिरू न देण्याची चेतावणी या वेळी देण्यात आली.

अजित पवार यांच्या विरोधात गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) येथे निदर्शने !

विरोधी पक्षनेते, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात छत्रपती संभाजी महाराज हे कधीच धर्मवीर नसल्याचे वक्तव्य केले.

नशेची शोकांतिका !

या निमित्ताने येणारे प्रश्न अन् उघडे पडलेले प्रशासकीय, तसेच सामाजिक व्यवस्थांचे स्वरूप हेही संवेदनशील माणसाचे मन सुन्न करणारे आहे. सुसंस्कृत भारतात आता विदेशाप्रमाणे दारूच्या दुकानाबाहेर रांगाच्या रांगा पहायला मिळतात, ही शोकांतिका आहे.

मोशी (जिल्हा पुणे) येथील राजा शिवछत्रपती चौकाची दुरवस्था !

महापुरुषांच्या नावे असलेले चौक, स्मारके यांची स्वच्छता आणि निगा राखण्याचे दायित्व प्रशासनाने दुर्लक्षित करणे लज्जास्पद !

‘चर्च पाडून मशिदी बनवल्या असत्या’, तर जॉन ब्रिट्स असेच म्हणाले असते का ?

‘भाजपने आधी बाबरी मशिदीला लक्ष्य केले आणि आता वाराणसीतील ज्ञानवापी मशीद अन् मथुरेतील ईदगाह मशीद यांना लक्ष्य करत आहे’, असा आरोप माकपचे खासदार जॉन ब्रिट्स यांनी केला.