सातारा येथे अजित पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचा कडेलोट !

सातारा येथे अजित पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचा कडेलोट

सातारा, ३ जानेवारी (वार्ता.) – धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करणार्‍या अजित पवार यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचा किल्ले अजिंक्यतारा येथून कडेलोट करण्यात आला.

( सौजन्य: झी २४ तास )

भाजप युवा मोर्चाच्या वतीने हा कडेलोट करण्यात आला, तसेच अजित पवार यांनी समस्त हिंदूंच्या भावना दुखावल्या असून क्षमा मागावी, अन्यथा सातारा शहरामध्ये त्यांना फिरू न देण्याची चेतावणी या वेळी देण्यात आली.