मृत तरुणाच्या कुटुंबास पुणे महापालिकेने १६ लाख रुपयांची हानीभरपाई देण्याचा दिवाणी न्यायालयाचा आदेश !

रस्त्यातील खड्ड्यांमुळे तरुणाचा मृत्यू झाल्याचे प्रकरण

पुणे – रस्त्यातील खड्ड्यांत दुचाकी घसरून यश सोनी या तरुणाचा २६ जून २०१६ या दिवशी मृत्यू झाला होता. मुलाच्या मृत्यूच्या प्रकरणी दिनेश सोनी यांनी महापालिकेच्या विरोधात १ कोटी रुपयांचा दिवाणी दावा प्रविष्ट केला होता. रस्त्यातील खड्ड्यांचे दायित्व हे महापालिकेचे आहे, हे मान्य करत या तरुणाच्या कुटुंबास १६ लाख रुपये १६ टक्के व्याजासह पुणे महापालिकेने द्यावेत, असा आदेश दिवाणी न्यायाधिशांनी पुणे महापालिकेला दिला आहे.