मोशी – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने पुणे-नाशिक महामार्ग ते पुणे-मुंबई महामार्ग या दरम्यान प्रशस्त ‘स्पाईन रस्ता’ सिद्ध केला होता; मात्र पुणे-नाशिक महामार्गावर असलेल्या राजा शिवछत्रपती चौकाची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. चौकाची ओळख असलेल्या राजा शिवछत्रपती नामफलकावरच विज्ञापनदात्यांनी फ्लेक्स लावले आहेत. संतनगरकडे जाणार्या सेवा रस्त्यांवर अनेक व्यावसायिकांनी त्यांच्या दुकानातील जुने फ्रीज (शीतकपाट), लाकडी, तसेच लोखंडी वस्तू ठेवल्या आहेत. वाहन न लावण्याच्या जागेत अनेक जण दुचाकी लावत आहेत. त्यामुळे या सर्वांवर कारवाई करण्याची मागणी पादचारी नागरिकांनी केली आहे. (नागरिकांना अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वत:हून कारवाई का करत नाही ? – संपादक)
संपादकीय भूमिकामहापुरुषांच्या नावे असलेले चौक, स्मारके यांची स्वच्छता आणि निगा राखण्याचे दायित्व प्रशासनाने दुर्लक्षित करणे लज्जास्पद ! |