‘तहरीक-ए-तालिबान-पाकिस्तान’कडून पाक सैनिकाचा शिरच्छेद !

‘करावे तसे भरावे’, हाच नियम पाकच्या सैनिकांना लागू होतो !

महाराष्ट्र-कर्नाटक बससेवा तात्पुरती स्थगित : कर्नाटकातूनही महाराष्ट्रात एकही बस नाही !

कर्नाटक-महाराष्ट्र सीमा वादाच्या पार्श्‍वभूमीवर आणि ६ डिसेंबरला महाराष्ट्रातील ट्रकवर बेळगाव पथकर नाक्याजवळ झालेल्या आक्रमणानंतर महाराष्ट्र-कर्नाटक बससेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली होती.

केरळमध्ये चर्चमधील रविवारच्या प्रार्थनेवरून परंपरावादी आणि आधुनिक ख्रिस्ती यांच्यात वाद !

नेहमी हिंदु धर्मात प्रथा, परंपरा किंवा चाली-रिती यांवरून हिंदु धर्मियांमध्ये वाद झाल्यावर हिंदु धर्मावर टीका करणारे पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी ख्रिस्त्यांमध्ये वाद होऊन ३५ चर्च बंद पडल्यावर मात्र शांत आहेत !

तुम्ही देशाला नष्ट कराल !

तुम्ही देशाला नष्ट कराल. जर देशाची सीमा सुरक्षित नसेल, तर देश कसा चालेल ? तुम्हाला वाईट गोष्टींना लगाम घालायला हवा, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या सरकारला फटकारले.

दक्षिणेकडील ३ राज्यांमध्ये ‘मंडौस’ चक्रीवादळाची शक्यता  

तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि दक्षिण आंध्रप्रदेश येथे हे चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे.

बांगलादेशमध्ये विवाहित हिंदु महिलेवर सत्ताधारी अवामी लीगच्या ३ मुसलमान नेत्यांकडून सामूहिक बलात्कार

पाकिस्तान आणि बांगलादेश येथील हिंदूंना कुणीच वाली नसल्याने त्यांना अशा अत्याचारांना सामोरे जावे लागत आहे. ही स्थिती पालटण्यासाठी भारतात हिंदु राष्ट्राची स्थापन होणे आवश्यक आहे !

‘रेपो रेट’मध्ये ०.३५ टक्क्यांनी वाढ

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ‘रेपो रेट’मध्ये ०.३५ टक्के वाढ केली आहे. यामुळे रेपो दर ५.९० टक्क्यांवरून ६.२५ टक्के इतका झाला आहे. यामुळे आता गृहकर्ज, वाहन कर्ज, तसेच वैयक्तिक कर्ज अधिक महाग होणार आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये खलिस्तान्यांच्या कारवाया रोखण्यासाठी परदेशी नागरिकांच्या व्हिसाची तपासणी होणार !

ऑस्ट्रेलियामध्ये खलिस्तान्यांकडून भारतविरोधी कारवाया चालू आहेत. आता यांवर कठोर कारवाई करण्याची सिद्धता ऑस्ट्रेलियाच्या सरकारने केली आहे.

देहली महानगरपालिकेवर आम आदमी पक्षाची सत्ता !

देहली महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकूण २५० जागा असणार्‍या या महानगरपालिकेत आम आदमी पक्षाला १३४ जागा मिळाल्या आहेत, तर सत्ताधारी पक्ष भाजपला १०४ जागा मिळाल्याने त्यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागले आहे.