चीनकडून कोरोना संदर्भातील नियमांमध्ये सवलत !

चीनच्या नागरिकांच्या प्रचंड विरोधाला यश

बीजिंग (चीन) – चीनमध्ये शून्य कोविड धोरणामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. यामुळे ठिकठिकाणी लोक रस्त्यावर येऊन विरोध करू लागले आहेत. याचाच परिणाम म्हणून चीनचे साम्यवादी सरकारने काही प्रमाणात माघार घेत या संदर्भातील नियमांमध्ये सवलत दिली आहे.

या सवलतीनुसार लोकांना अलगीकरणाच्या वेळी घरातच रहाण्याची अनुमती देण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी कोरोना चाचणी करण्याचे बंधन रहित करण्यात आले आहे. केवळ रुग्णालय आणि शाळा येथेच ही चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे.