वादामुळे ३५ चर्च बंद
थिरूवनंतपूरम् (केरळ) – केरळमध्ये रोमन कॅथॉलिक चर्चमध्ये रविवारी होणार्या एका प्रथेवरून ख्रिस्ती संघटनांमध्येच वाद निर्माण झाल्याने राज्यातील ३५ चर्च बंद करण्यात आले आहेत. या चर्चबाहेर पोलिसांना तैनात करण्यात आले आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार शांतता कायम झाल्यानंतर चर्च प्रार्थनेसाठी उघडले जातील.
१. ख्रिस्त्यांच्या मान्यतेनुसार ईश्वराने ६ दिवसांत जगाची निर्मिती केली आणि ७ व्या दिवशी आराम केला होता. यामुळे ख्रिस्ती रविवारी येशू ख्रिस्ताची पूजा करतात. या पूजेस ‘होली मास’ म्हटले जाते.
२. रोमन कॅथॉलिक चर्चची स्थानिक शाखा ‘सायरो मालाबार’ने निर्देश जारी करत सांगितले की, या प्रार्थनेच्या वेळी पाद्री आणि भक्त यांचे तोंड पूर्व दिशेकडे असेल; मात्र केरळच्या आधुनिक कॅथॉलिक ख्रिस्त्यांच्या म्हणण्यानुुसार, ही गोष्ट कुठेही लिहिलेली नाही. यामुळे अनुयायी पाद्य्रांना पाहू शकत नाहीत आणि त्यांच्याशी संवाद करू शकत नाहीत.
३. ख्रिस्ती समुदायाच्या तज्ञांनुसार नियम असे सांगतो की, प्रार्थनेच्या वेळी पाद्य्रांना निम्मा वेळ अनुयायांकडे पाहिले पाहिजे. उर्वरित काळ पूर्व दिशेकडे पाहिले पाहिजे; मात्र आधुनिक ख्रिस्त्यांनी ते मान्य करण्यास नकार दिला. त्यांच्या म्हणण्यानुसार, ५० वर्षांपासूनची प्रथा चालू राहिली पाहिजे.
४. अल्माया मुन्नेट्टम संघटनेनुसार, ‘आम्ही पोप फ्रान्सिस यांची अनुमती घेतली की, आमच्या चर्चमध्ये लोकांकडे पाहून प्रार्थना होईल; मात्र आता आमच्यावर नवा आदेश मानण्यासाठी दबाव आणला जात आहे.’ ‘आदेश मागे न घेतल्यास रोमन कॅथॉलिक चर्चला गंभीर परिणाम भोगावे लागतील’, अशी चेतावणी संघटनेने आली आहे.
संपादकीय भूमिकानेहमी हिंदु धर्मात प्रथा, परंपरा किंवा चाली-रिती यांवरून हिंदु धर्मियांमध्ये वाद झाल्यावर हिंदु धर्मावर टीका करणारे पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी ख्रिस्त्यांमध्ये वाद होऊन ३५ चर्च बंद पडल्यावर मात्र शांत आहेत ! |