दक्षिणेकडील ३ राज्यांमध्ये ‘मंडौस’ चक्रीवादळाची शक्यता  

चेन्नई (तमिळनाडू) – हवामान खात्याने दक्षिणेकडील ३ राज्यांमध्ये ‘मंडौस’ चक्रीवादळ येण्याची चेतावणी दिली आहे. सध्या या वादळामुळे तमिळनाडूच्या किनारी भागांत पाऊस पडत आहे. तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि दक्षिण आंध्रप्रदेश येथे हे चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे. चक्रीवादळला ‘मंडौस’ हे नाव संयुक्त अरब अमिरातीने दिले आहे. अरबी भाषेत याचा अर्थ ‘खजिना’ असा होतो.

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, या वादळामुळे पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश, देहली आणि राजस्थान या राज्यांमध्ये ३ दिवस ढगांचे आच्छादन आणि पाऊस अपेक्षित आहे. त्यामुळे उत्तर भारतात थंडीचा नवा टप्पा चालू होण्याची शक्यता आहे.