बांगलादेशमध्ये विवाहित हिंदु महिलेवर सत्ताधारी अवामी लीगच्या ३ मुसलमान नेत्यांकडून सामूहिक बलात्कार

बलात्काराचे चित्रीकरण करून पीडितेच्या मोठ्या मुलाला पाठवले !

ढाका (बांगलादेश) – अवामी लीगच्या ३ नेत्यांनी एका हिंदु विवाहितेवर  सामूहिक बलात्कार केला. ही घटना लालमोनिरहाट येथे घडली. बलात्कार्‍यांनी या कृत्याचे चित्रीकरण करून ते तिच्या मोठ्या मुलाला पाठवले आणि कायदेशीर तक्रार केल्यास सामाजिक माध्यमांवरून हा व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी दिली, अशी माहिती ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज’ या ट्विटर खात्यावरून ट्वीट करून देण्यात आली.

दुसर्‍या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, असद मिया, मिलन मिया आणि कुलू मिया अशी बलात्कार करणार्‍यांची नावे आहेत. पोलीस अशा घटनांची तक्रार नोंदवून घेत नाहीत. प्रसारमाध्यमेही या विषयी मौन बाळगून आहेत. आरोपी अवामी लीगचे प्रभावशाली नेते असल्याने १० दिवस उलटूनही पोलीस गुन्हा नोंदवून घेत नाहीत.

संपादकीय भूमिका

  • बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना अवामी लीगच्या अध्यक्षा असतांना अशा घटना कशा घडतात ? शेख हसीना यांचे भारताशी संबंध चांगले संबंध आहेत, तर भारत सरकार बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार रोखण्यासाठी हसीना यांच्यावर दबाव का आणत नाही ?
  • पाकिस्तान आणि बांगलादेश येथील हिंदूंना कुणीच वाली नसल्याने त्यांना अशा अत्याचारांना सामोरे जावे लागत आहे. ही स्थिती पालटण्यासाठी भारतात हिंदु राष्ट्राची स्थापन होणे आवश्यक आहे !