नवी देहली – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ‘रेपो रेट’मध्ये ०.३५ टक्के वाढ केली आहे. यामुळे रेपो दर ५.९० टक्क्यांवरून ६.२५ टक्के इतका झाला आहे. यामुळे आता गृहकर्ज, वाहन कर्ज, तसेच वैयक्तिक कर्ज अधिक महाग होणार आहे. यापूर्वी सप्टेंबरमध्ये झालेल्या बैठकीत व्याजदर ५.४० टक्क्यांवरून ५.९० टक्के करण्यात आले होते.
रेपो रेट के बढ़ने से आपके लोन की ईएमआई में इजाफा होने वाला है और आपके लिए लोन लेने महंगे हो जाएंगे-#RBIMonetaryPolicy #RBI #RepoRate #India https://t.co/MqFdMY7auF
— ABP News (@ABPNews) December 7, 2022
‘रेपो रेट’ (दर) म्हणजे काय ?
ज्या दराने बँका रिझर्व्ह बँकेकडून पैसे घेतात, त्या दराला ‘रेपो रेट (दर)’ म्हणतात. रेपो दर वाढणे, म्हणजे बँकांना रिझर्व्ह बँकेकडून मिळणार्या कर्जदरात वाढ होणे. रेपो दर अल्प होणे, म्हणजे बँकेला स्वस्तात पैसे मिळणे. याचाच अर्थ रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केली, तर सामान्यांच्या कर्जात वाढ होते.