देहली महानगरपालिकेवर आम आदमी पक्षाची सत्ता !

सत्ताधारी भाजपचा पराभव !

देहली – देहली महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. एकूण २५० जागा असणार्‍या या महानगरपालिकेत आम आदमी पक्षाला १३४ जागा मिळाल्या आहेत, तर सत्ताधारी पक्ष भाजपला १०४ जागा मिळाल्याने त्यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागले आहे.

गेली १५ वर्षे येथे भाजपची सत्ता होती. काँग्रेसला केवळ ९ जागा मिळाल्या आहेत.