बेंगळुरू येथे हिंदु राष्ट्र जागृती आंदोलनात राज्य सरकारकडे मागणी
बेंगळुरू – विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात ‘हलाल प्रमाणपत्रा’वर बंदी घाला आणि ‘लव्ह जिहाद’विरोधी पोलीसदल स्थापन करा, अशी मागणी शहरात झालेल्या हिंदु राष्ट्र जागृती आंदोलनात राज्य सरकारकडे करण्यात आली. बेंगळुरूमधील ‘फ्रीडम पार्क’ येथे आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात श्रीराम सेना, विश्व सनातन परिषद, राष्ट्ररक्षण पदे, हिंदु महासभा, हिंदु जनजागृती समिती आणि इतर हिंदुत्वनिष्ठ संघटना सहभागी झाल्या होत्या. कर्नाटकातील ‘लव्ह जिहाद’च्या वाढत्या प्रकरणांच्या पाश्वभूमीवर उत्तरप्रदेशच्या धर्तीवर राज्यात विशेष ‘लव्ह जिहाद’विरोधी पोलीस दल स्थापन करण्याची मागणी हिंदु संघटनांनी या वेळी केली. हिंदु जनजागृती समितीच्या सौ. भाव्या गौडा, विश्व सनातन परिषदेचे श्री. एस्. भास्करन्, राष्ट्ररक्षण पदेचे श्री. पुनिथ केरेहळ्ळी आणि श्री. प्रशांत संबरगी; श्रीराम सेनेचे श्री. सुंदरेश आणि श्री. अमरनाथ, तसेच हिंदु महासभेचे श्री. सुरेश जैन यांच्यासह अनेक हिंदु धर्माभिमान्यांनी या आंदोलनात भाग घेतला. त्यानंतर जिल्हाधिकार्यांमार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एक निवेदन देण्यात आले.
संपादकीय भूमिका
|