श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने पानीपत (हरियाणा) येथे श्रद्धांजली वहाण्यासाठी मोहीम ! – नितीन चौगुले

१४ जानेवारी २०२३ ला श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने पानीपत (हरियाणा) येथे श्रद्धांजली वहाण्यासाठी मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. १४ जानेवारी १७६१ ला पानिपतचे युद्ध झाले. त्यामुळे त्या मुहूर्तावरच या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

सोलापूर पद्मब्राह्मण पौरोहित संघमच्या वतीने १०८ सामूहिक श्री सत्यनारायण व्रतपूजन सोहळा उत्साहात !  

पवित्र शिवकेशव मास निमित्त कार्तिक शुद्ध दशमीच्या मुहूर्तावर १०८ सामूहिक श्री सत्यनारायण व्रतपूजन करण्यात आले. हे व्रतपूजन पूर्व भागातील पद्मावती कॅनर्व्हेशन सभागृह येथे भक्तीमय वातावरणात करण्यात आले.

नियोजन विभागाचे पूर्ण कामकाज संगणकीय प्रणालीद्वारे होणार ! – डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी

सर्व शासकीय विभागांनी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून राबवण्यात येणार्‍या कामावरील नियंत्रणासाठी ‘इंटिग्रेटेड प्लॅनिंग ऑफिस ऑटोमेशन सिस्टीम’ (आयपास) या प्रणालीचा वापर करावा, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत. ते ‘आयपास प्रणाली प्रशिक्षण’ कार्यशाळेत बोलत होते.

संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापिठातील परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे गुण वाढवून केले उत्तीर्ण !

अशाप्रकारे गुण वाढवून उत्तीर्ण केलेले विद्यार्थी कसे काम करणार ?

संभाजीनगर येथे मुलीला जिवे मारण्याची धमकी देत महिलेवर सामूहिक अत्याचार !

महिला असुरक्षित असणे चिंताजनक आणि संतापजनक !

संभाजीनगर येथे ग्राहक येण्यासाठी महामार्गावरील दुभाजक तोडले !

प्रशासनाने नियमाप्रमाणे अपघात न होण्यासाठी दुभाजक केलेले असतांना ते तोडून स्वार्थ साधणार्‍या व्यावसायिकांचे परवानेही रहित केले पाहिजेत.

पाकिस्तान म्हणजे भारतमातेच्या भूमीवर झालेले अतिक्रमण ! – सुनील देवधर, राष्ट्रीय सचिव, भाजप

वर्ष १९४७ मध्ये आपल्याला केवळ स्वातंत्र्य मिळाले होते. भाषा, संस्कृती, परंपरा आणि विचार यांनी खरे स्वातंत्र्य वर्ष २०१४ नंतर मिळाले आहे. गुलामीची जाणीव करून देणारे ३ सहस्र कायदे संपवून टाकले. त्यातून प्रत्येकाचे जीवन सुकर होत आहे. काश्मीरमधील लोकांचे अश्रू पुसण्याचे काम कलम ३७० हटवून केले.

राजा सिंह ठाकूर यांना जामीन संमत

ऑगस्ट मासात राजा सिंह यांच्यावर एका ‘यूट्यूब व्हिडिओ’मध्ये महंमद पैंगबर यांच्याविषयी कथित टिप्पणी केल्याचा आरोप करण्यात आला होता.

(म्हणे) ‘द केरल स्टोरी’ चित्रपटावर बंदी घाला !’  

केरळ राज्यात धार्मिक द्वेष निर्माण होण्याच्या शक्यतेवरून काँग्रेसची मागणी
पोलीस महासंचालकांच्या आदेशानंतर चित्रपटाच्या विरोधात गुन्हा नोंद !

मंगळुरू येथील मलाली मशिदीच्या वादावर सर्वेक्षणाच्या मागणीवर न्यायालय सुनावणी करणार

मलाली मशीद ही पूर्वीचे हिंदु मंदिर असल्याचा विहिंपचा दावा !