राजा सिंह ठाकूर यांना जामीन संमत

प्रखर हिंदुत्वनिष्ठ राजा सिंह ठाकूर

भाग्यनगर – महंमद पैंगबर यांच्याविषयी कथित टिप्पणी केल्याच्या प्रकरणी भाजपचे निलंबित आमदार तथा प्रखर हिंदुत्वनिष्ठ राजा सिंह ठाकूर यांना उच्च न्यायालयाकडून जामीन संमत करण्यात आला. तेलंगाणा पोलिसांनी त्यांना प्रतिबंधात्मक अन्वेषण कायद्याच्या अंतर्गत अटक केली होती.

ऑगस्ट मासात राजा सिंह यांच्यावर एका ‘यूट्यूब व्हिडिओ’मध्ये महंमद पैंगबर यांच्याविषयी कथित टिप्पणी केल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर भाजपने त्यांना पक्षातून निलंबित केले होते. आमदार राजा सिंह यांनी सांगितले होते की, त्यांचा व्हिडिओ हा वादग्रस्त विनोदी कलाकार मुनावर फारुकी याच्या विडंबनात्मक कार्यक्रमाविषयीची प्रतिक्रिया होती.