शरद पवार यांची बहीण सरोज पाटील यांच्याकडून पू. संभाजीराव भिडे गुरुजी यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका
कागल (जिल्हा कोल्हापूर) – सर्वत्र जाती-द्वेष पसरवला जात आहे. तुमची मुले त्या संभाजी भिडेच्या नादाला लागली आहेत का बघा ? त्या गटार गंगेत तुमच्या मुलांना जाऊ देऊ नका, अशी विखारी टीका शेतकरी कामगार पक्षाचे दिवंगत नेते एन्.डी. पाटील यांच्या पत्नी आणि खासदार शरद पवार यांच्या बहीण सरोज पाटील यांनी केली. ए.बी.माझा.च्या वृत्तसंकेतस्थळावर हे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार समरजित घाटगे यांच्या प्रचारसभेत बोलत होत्या.
‘Check whether your children are following Sambhaji Bhide. Don’t let your children go into that sewer’. – Sharad Pawar’s sister Saroj Patil criticizes H.H. Sambhajirao Bhide Guruji in the most heinous way.
Even at the age of 87, H.H. Bhide Guruji is effortlessly striving day and… pic.twitter.com/ZSAVgSHzhK
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 19, 2024
संपादकीय भूमिकापू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी सहस्रो युवकांना दिशा देऊन देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी कृतीशील केले आहे. त्यांच्या प्रेरणेमुळे अनेक युवक व्यसनमुक्त झाले आहेत. वयाच्या ८७ वर्षीही पू. संभाजीराव भिडेगुरुजी अहोरात्र छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांची पिढी घडवण्यासाठी धडपडत आहेत. याउलट शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून त्या पक्षाच्या माध्यमातून सातत्याने समाजात जातीयवादाद्वारे फूट पाडणे, हिंदूंच्या संतांची जातीच्या आधारे विभागणी करून त्यांच्यावर चिखलफेक करणे, यांसारख्या अनेक समाजघातकी कृती घडत आहेत. त्यामुळे सरोज पाटील यांनी पू. गुरुजींसारख्या ऋषितुल्य व्यक्तीमत्त्वावर केलेली टीका म्हणजे सूर्यावर थूंकण्यासारखे आहे ! |