Vote Jihad – Maharashtra Elections : ‘व्होट जिहाद’ला पराभूत करण्याचे संतांचे आवाहन !

आज महाराष्ट्रात मतदान

मुंबई : महाराष्ट्रात उद्या, २० नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक रहाल, तर सुरक्षित रहाल’ आणि ‘व्होट जिहाद’ या घोषणांना देशातील अनेक प्रमुख संत आणि साधू यांनी पाठिंबा दिला आहे. त्यांनी या संदर्भात व्हिडिओ संदेश प्रसारित केले आणि जनतेला सनातन धर्माच्या रक्षणासाठी मतदान करण्याचे आवाहन केले.

या संत आणि साधू यांचे म्हणणे आहे की, देशातील मुसलमान धर्मगुरु हिंदुत्वविरोधी सरकारांना मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. अशा परिस्थितीत हिंदु समाजानेही एकत्र येऊन हिंदुत्वनिष्ठ पक्षांच्या समर्थनार्थ मतदान केले पाहिजे.

(सौजन्य : DeshGujratHD)

हिंदुत्वनिष्ठ पक्षांना पाठिंबा द्या ! – मां बगलमुखी सिद्धपीठाचे पीठाधीश्‍वर त्रिशूल बाबा

जर भारतातील मुसलमान मौलवींनी (इस्लामच्या धार्मिक नेत्यांनी) हिंदुत्वनिष्ठ सरकारच्या विरोधात मतदान करण्याचे आवाहन केले, तर आम्ही आमच्या हिंदु बांधवांनाही सनातन धर्मासाठी काम करणार्‍या हिंदुत्वनिष्ठ सरकारला पाठिंबा देण्याचे आवाहन करतो, असे मां बगलमुखी सिद्धपीठाचे पीठधीश्‍वर त्रिशूल बाबा यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले की, यालाच आपण प्राधान्य दिले पाहिजे. आज भारतीय भूमीवर हिंदुविरोधी सरकार स्थापन करण्यासाठी कट रचला जात आहे, हे सत्य आपल्याला स्वीकारावे लागेल. अशा परिस्थितीत आम्ही हिंदूंना विनंती करतो की, त्यांनी केवळ हिंदुत्वनिष्ठ पक्षांना मतदान करावे जेणेकरून आपला धर्म आणि संस्कृती यांचे रक्षण होऊ शकेल.

सनातन धर्माच्या रक्षणासाठी हिंदूंनी संघटित होऊन हिंदुत्वनिष्ठ पक्षांना मतदान करावे ! – स्वामी हंसराम

हरिशेव उदासी आश्रमाचे महामंडलेश्‍वर स्वामी हंसराम म्हणाले की, महाराष्ट्रातील निवडणुकांच्या वेळी काही इस्लामी धर्मगुरूंनी, ‘जे भाजपला मतदान करतील, त्यांचे ‘हुक्का पाणी’ (बहिष्कार घालणे) बंद केले जाईल’, असे आवाहन केले आहे. अशा आवाहनांना आपण विरोध केला पाहिजे. देशाच्या आणि सनातन धर्माच्या रक्षणासाठी हिंदु समाजाने संघटित होऊन हिंदुत्वनिष्ठ पक्षांना मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले. आज जर आपण एकजूट नसलो, तर आपण कधीही एकजूट होणार नाही.

हे ही वाचा –

हिंदु धर्माचे रक्षण करणार्‍या उमेदवारांना आगामी निवडणुकीत मतदान करा ! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज

हिंदूंना स्वतःचे संरक्षण करण्याचा अधिकार हवा ! – Shankaracharya Swami Sadanand Saraswati

संस्कृतीच्या रक्षणासाठी मतदान करा ! – सौरभ गौर

धर्म रक्षा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सौरभ गौर यांनी म्हटले की, आजकाल काही मौलवींद्वारे खेळला जाणारा ‘व्होट जिहाद’चा खेळ चुकीचा आहे. जर मुसलमान समाज हिंदुविरोधी पक्षांना मतदान करत असेल, तर हिंदु समाजानेही संघटित होऊन हिंदुत्वनिष्ठ पक्षांना मतदान करावे, असे आवाहन मी करतो. असे केल्याने आपण हिंदुविरोधी शक्तींचा पराभव करू शकतो. हिंदु समाजाने त्यांच्या हक्कांसाठी एकजुटीने उभे रहाण्याची आणि धार्मिक राजकारणाच्या पलीकडे त्यांची ओळख अन् संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी मतदान करण्याची वेळ आली आहे.

जिहादला मतदान करणे ही चिंतेची गोष्ट ! – महंस राजू दास

महाराष्ट्र निवडणुकीत ज्या प्रकारे ‘व्होट जिहाद’ केला जात आहे, तो चिंतेचा विषय आहे. उलेमा (इस्लाम धर्माविषयी ज्ञान असणारे) आणि मौलवी हे लोकांना भाजपच्या विरोधात मतदान करण्यासाठी आवाहन करत आहेत. काही धार्मिक नेत्यांनी लोकांना सनातन धर्माचे रक्षण करणार्‍यांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून हिंदुत्वाची विचारधारा असलेले लोक निवडणुका जिंकू शकतील आणि राष्ट्रविरोधी शक्तींचा पराभव करू शकतील. हिंदु विचारधारेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आणि राष्ट्रविरोधी शक्तींना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याने हिंदु धार्मिक नेत्यांना पुढे यावे लागले. अशा परिस्थितीत हिंदु धर्माचे नेते आणि समाजातील इतर घटक यांनी एकत्र येऊन संस्कृती आणि विचारधारा यांचे रक्षण करणे आवश्यक आहे, असे आवाहन अयोध्येतील हनुमान गढीचे महंत राजू दास यांनी केले.

नागरिकांनी दिशाभूल करणार्‍या आणि विभाजनकारी गोष्टींपासून दूर रहावे ! – महंत दुर्गादास

अखिल भारतीय आखाडा परिषदेचे प्रवक्ते महंत दुर्गादास ‘व्होट जिहाद’वर म्हणाले की, मौलानांनी व्होट जिहादची जी घोषणा केली आहे ती केवळ देशद्रोह नाही, तर कायद्याच्या दृष्टीकोनातूनही चुकीची आहे. अशा प्रकारच्या आवाहनामुळे देशाची एकता आणि अखंडता यांना धोका निर्माण होतो. मतदान प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे आणि तो कोणताही धर्मगुरु किंवा व्यक्ती हिरावून घेऊ शकत नाही. बेरोजगारी, सीमा सुरक्षा आणि सामाजिक सलोखा यांसारख्या देशाच्या समस्यांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. नागरिकांनी दिशाभूल करणार्‍या आणि विभाजनकारी गोष्टींपासून दूर रहावे.