पनवेल येथील न्यायालयात संशयित आरोपीकडून पोलिसाला मारहाण !

प्रतिकात्मक छायाचित्र

पनवेल – येथील न्यायालयाने एका खटल्याच्या सुनावणीच्या काळात संशयित आरोपीला ८ डिसेंबर हा पुढील दिनांक दिला; मात्र त्या संशयिताला पोलिसांच्या कह्यात न रहाता घरी जायचे होते. त्यामुळे त्याने वैतागून पोलिसालाच मारहाण करण्यास प्रारंभ केला. पनवेल येथील न्यायालयात पहिल्या मजल्यावर महिला अधिवक्त्यांच्या कक्षाबाहेर ही घटना घडली. संशयित आरोपी संतोष याला कोरोनाकाळात पत्नीच्या खुनाप्रकरणी अटक करण्यात आली आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे संतोषला विलगीकरणात ठेवले होते. तेव्हा त्याने संतप्त होऊन पत्नीचा खून केला. त्याच्यावर पुन्हा एकदा पोलीस कर्मचार्‍याला मारहाण आणि सरकारी कामात अडथळा असे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

संपादकीय भूमिका

आरोपीकडून मार खाणारे पोलीस जनतेचे रक्षण कसे करणार ?