राज्यपाल कोश्यारी यांना पदावरून हटवण्यात यावे ! – उदयनराजे भोसले

डावीकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उदयनराजे भोसले

सातारा, २१ नोव्हेंबर (वार्ता.) – आज या महाराष्ट्रात काय चालले आहे ? कोणताही राजकीय पक्ष असूद्या तो छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेतल्याविना स्वत:च्या राजकीय आणि सामाजिक कार्याला प्रारंभ करू शकत नाही. राज्यपाल हे सन्मानाचे पद आहे. या पदाची उंची त्यांनी राखून ठेवली पाहिजे. भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनीही शिवरायांविषयी केलेले वक्तव्य अयोग्य असून त्यांची प्रवक्ते पदावरून हकालपट्टी केली पाहिजे, तसेच राज्यपाल कोश्यारी यांनाही पदावरून हटवण्यात यावे, अशी मागणी भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.