साधकांचे अचूक निरीक्षण असणार्‍या आणि वेळेचे नियोजन करून परिपूर्ण सेवा करणार्‍या गोवा येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. मीनाक्षी धुमाळ (वय ५२ वर्षे) !

गोवा येथील सौ. मीनाक्षी धुमाळ यांच्याविषयी त्यांच्या सहसाधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

‘प.पू. डॉ. आठवले यांचा भावसत्संग लाभणार असल्याविषयी पूर्वसूचना मिळणे

‘एकदा मी गोव्यातील रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात सेवेसाठी गेले होते. एके दिवशी सकाळपासूनच ‘आज मला प.पू. डॉक्टरांच्या भावसत्संगाचा लाभ होणार आहे’, असे वाटत होते. त्यामुळे माझी भावजागृती होत होती.