सातारा, २१ नोव्हेंबर (वार्ता.) – ‘श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट’च्या माध्यमातून आणि लोकसहभागातून संगम माहुली येथे कैलास स्मशानभूमी उभारण्यात आली आहे. आता या स्मशानभूतीत लवकरच वायू (गॅस) दाहिनी बसवण्यात येणार आहे, अशी माहिती ‘श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट’चे अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली.
राजेंद्र चोरगे पुढे म्हणाले की, ही वायू (गॅस) दाहिनी केवळ कर्करोग, दुर्धर आजार किंवा शवविच्छेदन झालेल्या व्यक्ती, मृत व्यक्तीच्या पश्चात घरी अंत्यसंस्कार करण्यासाठी कुणी नाही किंवा केवळ महिलाच आहेत, अशा मृत व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी वायू (गॅस) दाहिनीचा उपयोग करण्यात येणार आहे. इतर अंत्यसंस्कार हे नेहमीप्रमाणे शेणीमध्ये अग्निकुंडातच केले जाणार आहेत. काळाची पावले ओळखून भविष्यातील गैरसोयी टाळण्यासाठी ट्रस्टने हा निर्णय घेतला आहे. नागरिकांनीही याविषयी सहकार्य करावे.