मुंबई येथून ४ बांगलादेशी नागरिक अटकेत !

बांगलादेशींचा सुळसुळाट झालेला भारत !

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – देशात अवैधरित्या वास्तव्यास असलेल्या ४ बांगलादेशी नागरिकांना स्थानिक पोलिसांनी अटक केली. सोहेल जलील शेख, मेहबूब अहमद शेख, मोहीन शादत खान आणि रिकन उत्तमकुमार चकमा अशी त्यांची नावे आहेत. रिकनने देहली पारपत्र कार्यालयातून बनावट कागदपत्रांच्या साहाय्याने भारतीय पारपत्र मिळवून परदेशात जाण्याचा प्रयत्न केल्याचे अन्वेषणात उघडकीस आले आहे.

मुंबई शहरात अनधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम चालू केली आहे. त्यात मेहबूब शेख आणि मोहीन खान या दोघांना अटक केली. चौकशीत ते दोघेही बांगलादेशी नागरिक असल्याचे उघडकीस आले. आतापर्यंतच्या चौकशीत बांगलादेशातील गरिबी आणि उपासमारी यांना कंटाळून ते सर्वजण भारतात पळून आल्याचे उघडकीस आले आहे. सध्या सर्वजण न्यायालयीन कोठडीत आहेत.