पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या ग्रंथालयास वर्ष १७८६ मधील दुर्मिळ हस्तलिखित ‘गुरुचरित्र’ प्राप्त !

श्री. जगदिश गुळवणी यांनी अर्पण केलेले दुर्मिळ हस्तलिखित गुरुचरित्र

कोल्हापूर – श्री महालक्ष्मी मंदिरात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने ग्रंथालय उभे करण्यात येत आहे. ग्रंथालयासाठी श्री. जगदीश गुळवणी यांनी त्यांच्याकडे असलेले वर्ष १७८६ मधील प्राकृत ओवीबद्ध असे दुर्मिळ हस्तलिखित गुरुचरित्र अर्पण केले आहे. हे हस्तलिखित पूर्वीच्या काळी विशेष प्रकारच्या कागदावर नैसर्गिक शाईपासून सिद्ध करण्यात आले असून अशा हस्तलिखित ग्रंथाच्या संदर्भाचा वापर करत पुस्तक निर्माण होत असे. ज्या भाविकांकडे असे दुर्मिळ ग्रंथ असतील, त्यांनी ते पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला द्यावेत, असे आवाहन सचिव श्री. शिवराज नाईकवाडे यांनी केले आहे.

श्री. जगदिश गुळवणी यांनी अर्पण केलेले दुर्मिळ हस्तलिखित गुरुचरित्र