स्त्रियांमध्ये असलेली राष्ट्रशक्ती त्यांनी जागृत केली पाहिजे ! – सौ. कल्याणी गाडगीळ

उपस्थितांना मार्गदर्शन करतांना श्री. संतोष देसाई

तासगाव (जिल्हा सांगली) – पालकांनी त्यांच्या पाल्यांच्या संदर्भात जागृत राहून शाळा-महाविद्यालयात जाणार्‍या मुलींविषयी मनमोकळेपणाने संवाद साधला पाहिजे. समाजात वावरतांना महिलांनी प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्याची क्षमता निर्माण केली पाहिजे. स्त्रियांनी त्यांच्यामध्ये असलेली राष्ट्रशक्ती जागृत केली पाहिजे, असे आवाहन राष्ट्रसेविका समितीच्या सौ. कल्याणी गाडगीळ यांनी केले. त्या शिवतीर्थ मंडळाच्या वतीने सानेगुरुजी नाट्यगृह तासगाव येथे ‘श्रद्धाला श्रद्धांजली’ आणि ‘लव्ह जिहाद’ या विषयावर आयोजित व्याख्यानात बोलत होत्या. या प्रसंगी २०० हून अधिक नागरिक उपस्थित होते.

 

मार्गदर्शनाला उपस्थित नागरिक

या वेळी धर्म जागरण महाराष्ट्र प्रदेशचे श्री. चंद्रकांत शिंदे म्हणाले, ‘‘हिंदूंनी त्यांची महान संस्कृती जपली, तर ते ‘लव्ह जिहाद’सारख्या समस्यांना चांगल्या प्रकारे हाताळू शकतो. ‘लव्ह जिहाद’ला बळी पडलेल्या अनेक तरुणींना आम्ही सुखरूप बाहेर काढले आहे. आपल्या सर्वांसाठी छत्रपती संभाजी महाराज यांचा आदर्श असून त्यांचे जगणे आणि मृत्यू यांतून आपल्याला पुष्कळ शिकण्यासारखे आहे.’’

हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष देसाई यांनी या प्रसंगी ‘लव्ह जिहाद’ म्हणजे काय ? त्यावर कोणत्या उपाययोजना करू शकतो, याविषयी मार्गदर्शन करून युवक-युवती यांनी धर्माचरण केल्यास त्यातून मनोधैर्य वाढून कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाणे शक्य होते, असे सांगितले.

क्षणचित्रे

१. या प्रसंगी शिवतीर्थ मंडळाने हिंदु जनजागृती समिती प्रकाशित ‘लव्ह जिहाद’ या ५० ग्रंथांची मागणी केली.

२. एक महिलेने तिला चाकरी करतांना आलेले अनुभव सांगून आपण कसे सक्षम बनले पाहिजे, हे सांगितले.