अमेरिकेमध्ये आता गांजाचा वापर केल्यास कारवाई होणार नाही !

गांजाच्या प्रकरणी कारागृहातील सर्वांची होणार सुटका !

ज्ञानवापीतील शिवलिंगाच्या ‘कार्बन डेटिंग’ चाचणीवरील सुनावणी ११ ऑक्टोबरला !

मुसलमान पक्षाने याविषयी त्याची बाजू मांडण्याची विनंती केल्यावर न्यायालयाने हा निर्णय घेतला.

वर्ष २०२३ मध्ये अनेक देशांवर मंदीचे संकट येणार ! – इंटरनॅशनल मॉनिटरी फंड

फंडच्या प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जीवा यांनी सांगितले की, लोकांच्या उत्पन्नात होणारी घट आणि वाढती महागाई यांचा अर्थ अनेक देश आर्थिक मंदीचा सामना करत आहेत. पुढील वर्षी याचे प्रमाण आणखी वाढू शकते.

बिदर (कर्नाटक) येथे ५६२ वर्ष जुन्या मदरशामध्ये जमावाकडून पूजा

मदरशाजवळ वर्षातून दोन वेळा केली जाते पूजा !
मुसलमानांकडून विरोध

धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र अपरिहार्य !

नैतिकता आणि आचारधर्म बालपणापासून न शिकवणारे पालक अन् शासन यांच्यामुळे भारतात सर्वत्र अनाचार, राक्षसी वृत्ती प्रबळ झाल्या आहेत. ‘या स्थितीमुळे बलात्कार, भ्रष्टाचार, विविध गुन्हे, देशद्रोह आणि धर्मद्रोह यांचे प्रमाण अपरिमित होऊन देश रसातळाला गेला आहे. त्यावर उपाय एकच आणि तो म्हणजे धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

इस्लामी देशांत हिजाबला विरोध होत असतांना भारतातील हिजाब समर्थक कुठे आहेत ? – अधिवक्त्या रचना नायडू, दुर्ग, छत्तीसगड

इस्लामी देशांत हिजाबला विरोध होत असतांना भारतात त्याविषयी आकांडतांडव करणारे निधर्मीवादी आता कुठे आहेत ?

कोल्हापुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दसरा संचलन उत्साहात : नागरिकांकडून स्वागत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दसरा संचलन ५ ऑक्टोबरला उत्साहात पार पडले. शहरातील प्रमुख मार्गांवर स्वयंसेवकांनी पूर्ण गणवेशात संचलन केले. संचलनामध्ये राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील सहभागी झाले होते. अत्यंत शिस्तबद्ध झालेल्या संचलनाचे स्वागत नागरिकांनी जागोजागी पुष्पवृष्टी करून केले.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सोलापूर येथे श्री दुर्गामाता दौडीचे स्वागत !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने घटस्थापनेपासून प्रतिदिन शहरातील ७ भागांतून दुर्गामाता दाैड काढण्यात आली. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री दुर्गामाता दौडीच्या वेळी सौ. श्रीदेवी पाटील आणि सौ. सुनीता न्यामणे यांनी धर्मध्वजाचे औक्षण केले.

कराड (जिल्हा सातारा) येथे श्री दुर्गामाता दौडीची उत्साहात सांगता

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्री दुर्गामाता दौडीची दसर्‍याच्या दिवशी उत्साहात सांगता झाली. येथील शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ मूर्तीचे पूजन करून, तसेच शस्त्र आणि भगवा ध्वज यांचे पूजन करून दौडीला प्रारंभ झाला.