‘हर घर भगवा’ अभियानाला पुणे जिल्ह्यातील धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

पुणे जिल्ह्यात ‘हर घर भगवा’ अभियानाला धर्मप्रेमींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. ‘हर घर भगवा’ मोहिमेत सहभाग घेऊन ‘हिंदु राष्ट्रासाठी सीमोल्लंघन करा’, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले होते.

आपण पाश्चिमात्यांकडून शिकलो, हे चुकीचे आहे ! – अमीश त्रिपाठी, प्रख्यात लेखक

त्रिपाठी यांच्या ‘रामचंद्र’ पुस्तक मालिकेतील हे ४ थे पुस्तक आहे. ते पुढे म्हणाले की, भारतीय संस्कृतीमध्ये चांगले आणि वाईट अशी सोपी विभागणी करता येत नाही. देव नायक आणि असुर खलनायक, असे चित्रण कुठेच नाहीच.

ऋषीमुनींनी केलेल्या सर्व संशोधनाचा अभ्यास केला पाहिजे ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

रामटेक (नागपूर) येथील ताई गोळवलकर महाविद्यालयात ‘भारतीय संस्कृती आणि संस्कार’ या विषयावर मार्गदर्शन !

कुंकवाची उधळण करत श्री तुळजाभवानीदेवीचे सीमोल्लंघन मोठ्या उत्साहात साजरे !

सहस्रो भाविकांच्या उपस्थितीत आणि कुंकवाची उधळण करत विजयादशमीच्या पहाटे श्री तुळजाभवानीदेवीचे सीमोल्लंघन साजरे झाले. भिंगार (जिल्हा नगर) येथून आलेल्या मानाच्या पलंग पालखीचे तुळजाभवानी मंदिरात आगमन झाले.

वादळामुळे कागदपत्रे बाहेर उडाली नाहीत ! – पुणे जिल्हाधिकारी कार्यालय

पावसामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छताचे ‘पॅनल्स’ उडून इमारतीच्या परिसरात पडले. कार्यालयातील कोणतीही कागदपत्रे उडाली नाहीत, असे स्पष्टीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने देण्यात आले.

अध्यात्माला सेवाकार्याची जोड हे जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज परिवाराचे कार्य लाख मोलाचे आणि अनुकरणीय ! – सत्यजित तथा नाना कदम, भाजप

६ ऑक्टोबरला गडमुडशिंगी येथे पाटील मैदानात जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज परिवार सत्संग मेळावा, पादुकादर्शन आणि भजन कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला होता.

‘हर घर भगवा’ या मोहिमेअंतर्गत रामनाथी (गोवा) आणि देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात भगव्या ध्वजाचे पूजन !

हिंदु जनजागृती समितीच्या २० व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने देशभरात ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ साजरे केले जात आहे. या अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदु राष्ट्राच्या मागणीचा आवाज बुलंद करण्यासाठी समितीने ३ ऑक्टोबरपासून ‘हर घर भगवा’ या देशव्यापी मोहिमेचा शुभारंभ केला.

नाशिक येथे ५ वर्षांनी सप्तश्रृंग गडावर बोकडबळी !

प्रतिवर्षीप्रमाणे आश्विन नवमीस गडावर नवमीच्या दिवशी शतचंडी याग आणि होमहवन विधी चालू करण्यात आला. बोकड बळीच्या विधीनंतर पुरोहितांच्या मंत्रघोषात बळीची आहुती देऊन दसर्‍याचा सोहळा पार पडला.

मैलापाणी थेट नदीमध्ये येत असल्याने पुणे शहराचे ‘स्वच्छ भारत अभियाना’मध्ये नामांकन घसरले !

केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’मध्ये मुळा-मुठा नदीत येणार्‍या मैलामिश्रित पाण्यामुळे पुणे महापालिकेचे नामांकन घसरले आहे. त्यामुळे ‘जायका प्रकल्प’ जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत पुण्याला ‘पंचतारांकित’ शहराचे नामांकन मिळणार नाही आणि पहिल्या पाचमध्येही स्थान मिळवणे अवघड आहे

बनावट कागदपत्रांद्वारे महारेराची नोंदणी करणार्‍या ५२ विकासकांची नोंदणी रहित !

कागदपत्रांची छाननी न करता बांधकामाची अनुमती देणे आणि महारेरा नोंदणी करणे, ही कामे करणार्‍या अधिकार्‍यांवरही कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कठोर कारवाई केली, तरच या गोष्टींना आळा बसेल !