कराड (जिल्हा सातारा) येथे श्री दुर्गामाता दौडीची उत्साहात सांगता

श्री दुर्गामाता दौडीमध्ये सहभागी धारकरी

कराड, ६ ऑक्टोबर (वार्ता.) – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्री दुर्गामाता दौडीची दसर्‍याच्या दिवशी उत्साहात सांगता झाली. येथील शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ मूर्तीचे पूजन करून, तसेच शस्त्र आणि भगवा ध्वज यांचे पूजन करून दौडीला प्रारंभ झाला. शहरात ठिकठिकाणी दौडीचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. या वेळी धारकरी श्री. सागर आमले यांनी दौडीचा उद्देश सांगितला.

या वेळी भाजप महाराष्ट्र प्रदेश सचिव, तसेच ‘हिंदू एकता आंदोलना’चे सातारा जिल्हाध्यक्ष श्री. विक्रम पावसकर, नगरसेवक श्री. हणमंतराव पवार, हिंदू एकता आंदोलनाचे श्री. चंद्रकांत जिरंगे, भाजपचे श्री. विष्णू पाटसकर, रेठरे (तालुका कराड) येथील सरपंच सौ. सुवर्णा कापूरकर यांसह विविध राजकीय पक्ष आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, तालुक्यातील सहस्रो धारकरी, युवक-युवती, तसेच महिला मोठ्या संख्येने भगवे फेटे परिधान करून उपस्थित होत्या.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री दुर्गामाता दौडीचे स्वागत

दुर्गामाता दौडीचे स्वागत करतांना समितीचे कार्यकर्ते

येथील गोंदवलेकर महाराज श्रीराम मंदिराच्या प्रांगणात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सौ. चंद्रभागा भस्मे यांनी औक्षण करून ध्वजाला पुष्पहार अर्पण करून दौडीचे स्वागत केले.