वर्ष २०२३ मध्ये अनेक देशांवर मंदीचे संकट येणार ! – इंटरनॅशनल मॉनिटरी फंड

इंटरनॅशनल मॉनिटरी फंडच्या प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जीवा

नवी देहली – वर्ष २०२३ मध्ये जगातील अनेक देशांना आर्थिक मंदीचा सामना करावा लागू शकतो, अशी चेतावणी ‘इंटरनॅशनल मॉनिटरी फंड’ने दिली आहे.

फंडच्या प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जीवा यांनी सांगितले की, लोकांच्या उत्पन्नात होणारी घट आणि वाढती महागाई यांचा अर्थ अनेक देश आर्थिक मंदीचा सामना करत आहेत. पुढील वर्षी याचे प्रमाण आणखी वाढू शकते.